प्रगती आणि विकास
छायाचित्रे
गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, शासकीय योजना व विकास प्रकल्प यांचे छायाचित्रण या गॅलरीत सादर केले आहे.
गावातील विविध विकास कामे
ग्रामपंचायत कार्यालय मरतोळी अंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्य असे मंदिर उभारण्यात आलेले आहे गावाच्या परिसरात पंचपुरा ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अडीच एकर जमिनीमध्ये वसलेले आहे म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रामध्ये वसलेले आहे मंदिरात सुसज्ज परिसर आहे बैठक व्यवस्था आहे मोठ-मोठे सभागृह आहेत शुद्ध पिण्याचे पाणी आहे वृक्ष लागवड केलेली आहे वयोवृद्ध माणसांना नागरिकांना आलेल्या भक्तजनांना बसण्यासाठी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे मंदिरामध्ये नित्यनेमाने हरिपाठ भजन कीर्तन काकडा असे दैनंदिन कार्यक्रम होतात मंदिरामध्ये वारकरी शिक्षण चालते जवळपास 50 विद्यार्थी तेथे उपस्थित आहेत त्यांना गायन वादन कीर्तन असे वेगवेगळे ज्ञान वारकरी परंपरेप्रमाणे दिले जाते मंदिराच्या बाजूने मुख्य मोठा नाला वाहतो सुंदर अशी वृक्ष लागवड केलेली आहे झऱ्याचा खुळखुळ आवाजामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये मुख्य रस्त्यालगत ही मंदिर उभारलेला आहे या मंदिरास भरपूर असे लोक मोठ्या श्रद्धेने येतात या मंदिराला गावातील व तसेच गावाशेजारील पंचपुऱ्यातील सर्व नागरिक नित्यनेमाने दर्शनासाठी येतात